मद्यपींची पोलिस महिलेला धक्काबुक्की 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

मुंबई - मद्यधुंद अवस्थेत गाडीत बसलेल्या चौघांनी नाकाबंदी करत असलेल्या पोलिसांच्या पथकातील महिलेला धक्काबुक्की केल्याची तसेच पोलिसांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना शनिवारी (ता. 3) रात्री अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका वाहनचालकाला अटक केली. या घटनेनंतर फरारी झालेल्या त्याच्या तीन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. 

अंधेरी पूर्वेकडील रिजन्सी हॉटेलसमोरील रस्त्यावर सहार वाहतूक पोलिसांनी रविवारी रात्री नाकाबंदी केली होती. 12.30च्या सुमारास तेथे आलेली इनोव्हा गाडी थांबवली. गाडीचा चालक अनंत माने मद्य प्यायलाचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ब्रेथ ऍनलायझर मशीनमध्ये फुंकर मारण्यास सांगितले; मात्र मानेने तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर वाहनात बसलेल्या तिघांनी पोलिसांच्या पथकातील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या माने याने पोलिसांच्या गाडीची काचही फोडली. 

गस्त पथकातील पोलिसांनी ही माहिती अंधेरी पोलिस ठाण्याला दिल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या अतिरिक्त तुकडीने माने याला अटक केली; मात्र त्याचे साथीदार पळून केले. माने याला गुरुवारपर्यंत (ता. 8) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

Web Title: mumbai news police