मुंबई : दिंडोशीतून 60 लाखांचे चरस केले जप्त

मंगेश सौंदाळकर
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

इशाक अहमद मोहम्मद अशरफ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इशाक हा काश्मीरचा रहिवासी आहे. त्याच्या विरोशात एनडीपी कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने दिंडोशी परिसरात कारवाई करुन 15 किलो चरस जप्त केले.

जप्त केलेल्या चरसची किंमत 60 लाख रूपये इतकी आहे. इशाक अहमद मोहम्मद अशरफ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इशाक हा काश्मीरचा रहिवासी आहे. त्याच्या विरोशात एनडीपी कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

इशाक हा रविवारी दिंडोशी परिसरात चरस घेऊन आला होता, त्याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.

Web Title: Mumbai news police arrested one person