मुंबई: वांद्रे रेल्वे स्थानकात कमांडो

मंगेश सौंदाळकर
रविवार, 3 सप्टेंबर 2017

सदरवेळी स्टेशन व स्टेशन परीसरातील अडगळीच्या जागा व संशयित इसम आणि त्यांचेकडील सामानाची बारकाईने तपासणी करण्यात आली.

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त सतर्कतेच्या दृष्टिकोनातून रविवारी बांद्रा रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील बांद्रा रेल्वे स्टेशन पोलीस उपनिरीक्षक भोसले, शस्त्रसज्ज कमांडो व ड्युटीवरील पोलीस कर्मचारी यांच्यासह विषेश घातपात विरोधी तपासणी केली.

सदरवेळी स्टेशन व स्टेशन परीसरातील अडगळीच्या जागा व संशयित इसम आणि त्यांचेकडील सामानाची बारकाईने तपासणी करण्यात आली. दरम्यान काहीएक आक्षेपार्ह मिळून आले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तोंडवळकर यांनी सांगितले.

Web Title: Mumbai news police on bandra station