सहायक पोलिस आयुक्ताचा स्वाइन फ्लूने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई - स्वाइन फ्लूमुळे एका सहायक पोलिस आयुक्ताचा मंगळवारी (ता. 11) वांद्रे येथील होली क्रॉस रुग्णालयात मृत्यू झाला. दिलीप शिंदे असे त्यांचे नाव आहे.

मुंबई - स्वाइन फ्लूमुळे एका सहायक पोलिस आयुक्ताचा मंगळवारी (ता. 11) वांद्रे येथील होली क्रॉस रुग्णालयात मृत्यू झाला. दिलीप शिंदे असे त्यांचे नाव आहे.

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील असलेले शिंदे 1987 मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाले. मुंबईत असताना त्यांनी सांताक्रूझ, माहीम, धारावी या पोलिस ठाण्यांत विविध पदांवर काम केले. गेल्याच वर्षी त्यांना सहायक आयुक्तपदी बढती मिळाली. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेत ते प्रशासकीय विभागात कार्यरत होते. 7 जुलैला प्रकृती खालावल्याने त्यांना होली क्रॉस रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: mumbai news police commissioner death by swine flu