पोलिस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नालासोपारा - वसईतील पोलिस कर्मचाऱ्याने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 11) उघडकीस आली. वसईतील सर डी. एम. पेटीट रुग्णालयात या पोलिसावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. 

महेश गोसावी असे त्यांचे नाव असून, ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. बुधवारी रात्री 11 वाजता गोसावी यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर "मी झोपेच्या 50 गोळ्या खाल्ल्या आहेत. पालघरचे पोलिस अधीक्षक सिंगे खूप त्रास देतात' असा मेसेज केला. गोसावी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळताच त्यांच्या पत्नीने त्यांना वसईतील पेटीट रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्यांचा जीव बचावला. अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक मारुती पाटील आणि पालघरचे पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने आपण आत्महत्येचा प्रयत्न केला, असा जबाब गोसावी यांनी वसई पोलिसांना दिला.

Web Title: mumbai news police employee Suicide attempt by sleeping pills

टॅग्स