अपहरण धमकीप्रकरणी मुंबईत शोधमोहीम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मुंबई - मुंबईहून दिल्लीला निघालेल्या विमानाचे अपहरण झाल्याचे धमकीपत्र लिहिल्याप्रकरणी एका सराफाला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता जानेवारी 2016मध्ये मुंबई विमानतळावर आलेल्या हल्ल्याबाबतचा दूरध्वनीही त्यानेच केला होता का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मुंबईतील आरोपीच्या कार्यालयात शोधमोहीम राबवून काही संगणकीय उपकरणे जप्त केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

जेट एअरवेजच्या मुंबई-दिल्ली विमानाच्या शौचालयात हवाई सुंदरीला विमानाचे अपहरण झाल्याचे धमकीपत्र सापडले. त्याची माहिती वैमानिकाला दिल्यानंतर त्याने विमान अहमदाबाद विमानतळावर उतरवले होते. या प्रकरणी धमकीचे पत्र लिहिणाऱ्या बिरजू किशोर सल्ला याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: mumbai news police search campaign for kidnapping warning