प्रवाशांनो ‘सॅक पुढे पकडा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मुंबई - रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेस्थानकांत प्रवाशांनी पाठीवर अडकवलेल्या बॅगांमधून मोबाईल फोन तसेच पाकिटांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी अंधेरी स्थानकात रेल्वे पोलिसांनी ‘सॅक पुढे पकडा’ ही मोहीम राबवण्यास सुरू केली आहे. त्याअंतर्गत गर्दीच्या वेळी रेल्वे पोलिस मेगाफोनवरून प्रवाशांना बॅगा पुढे ठेवण्यासंदर्भात सूचना देत असतात.

रेल्वे प्रवासादरम्यान चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढत आहे. गर्दीचा फायदा उठवत चोरटे पूर्वी शर्ट किंवा पॅन्टच्या खिशातील पाकिटे, मोबाईल फोनची चोरी करत; आता पाठीला बॅग अडकवणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करत आहेत. गर्दीच्या वेळेत चोरटे फलाटांवरून जाणाऱ्या प्रवाशांच्या मागून चालतात. नंतर संधी मिळताच त्यांच्या पाठीवरील बॅगमधील मोबाईल, पाकिटे मारून पसार होतात.

अंधेरी स्थानकात अशा अनेक तक्रारी रेल्वे पोलिसांकडे येतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक प्रवासी साहित्य बॅगमध्ये ठेवतात. या पार्श्‍वभूमीवर अशा चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम सुरू केली आहे. लोकल पकडताना किंवा जिने चढताना बॅग पाठीवर अडकवल्यास चोऱ्या होऊ शकतात. त्यामुळे बॅग पुढील बाजूला ठेवा, अशा सूचना पोलिस गर्दीच्या वेळेत मेगाफोनवरून देतात. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण घटले आहे. या मोहिमेसाठी आम्ही पोलिस मित्रांचीही मदत घेणार आहोत, अशी माहिती अंधेरी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली. 

गर्दीच्या वेळेत चोरटे सक्रिय
सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी असते. याच वेळेत चोरटे सक्रिय असतात, असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

Web Title: mumbai news police theft passenger railway police