दिवाळीनंतर फुटणार राजकीय फटाके!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - नोव्हेंबरमध्ये महापौरपदाची मुदत संपणार असल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यात शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक गळाला लावण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्‍यता तर आहेच; परंतु स्वतःचे नगरसेवक फुटणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे मोठे आव्हान आघाडीसमोर आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नवी मुंबईत राजकीय फटाके फुटणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ५७, शिवसेना-भाजप ४४ तर काँग्रेसचे १० असे एकूण १११ नगरसेवक आहेत. यात अपक्षांवर मदार असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेसच्या १० नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे पालिकेत राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे; परंतु महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. महापौरपदासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नावाची चर्चा असल्याने शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेला बहुमतासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक गळाला लावावे लागणार आहेत. त्यासाठी तब्बल एक कोटींपेक्षा जास्त रकमेच्या ऑफर्स नगरसेवकांना दिल्या जात असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे नगरसेवक आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिवसेनेकडून नवी मुंबईतील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष शेट्टी, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल कौशिक व जिल्हाध्यक्ष दशरथ भगत या ज्येष्ठ नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही खेळी यशस्वी करण्यासाठी शिवसेनेला भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंची मदत घ्यावी लागणार आहे. राजकीय सूत्रे हलवण्यात हातखंडा असलेल्या संतोष शेट्टींचा मागील स्थायी समितीचा अनुभव पाहता या वेळी त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: mumbai news politics