पोस्टातील ‘आधार’ सेवा दुसऱ्याच दिवशी ठप्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - सर्व्हर बिघाडामुळे पोस्टात सुरू झालेली नवीन ‘आधार’ कार्ड काढण्याची सुविधा दुसऱ्याच दिवसापासून बंद पडली आहे. ३० नोव्हेंबरला या सेवेची सुरुवात पोस्टात करण्यात आली; पण ग्राहकांचा नवीन आधार कार्डचा डेटा सर्व्हरला पाठवण्यात येत नसल्याने आधारची सेवा ठप्प झाली आहे. याआधीही आधार सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा सुरू होण्यास उशीर झाला होता.   

पोस्टात नवीन आधार कार्डच्या सेवेसाठी संगणक आणि सर्व्हर कनेक्‍टिव्हिटी यांसारख्या पायाभूत सुविधा ‘आधार’मार्फत पुरवण्यात आल्या आहेत. पत्ता, मोबाईल यांसारखी माहिती अपडेट करण्याचे काम सध्या सुरू आहे; पण नवीन आधार नोंदणीची प्रक्रिया यामुळे ठप्प झाली आहे. बायोमेट्रिक डेटा तसेच व्यक्तिगत माहिती आधार सर्व्हरला पाठवता येत नसल्याची सबब पोस्टाकडून देण्यात येत आहे. ही सेवा सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. मुंबई जीपीओसह राज्यातील सहा विभागांत पोस्टाची ही सेवा सुरू झाली होती. आधार डेटा सीडिंगच्या अडचणीमुळे ही सेवा बंद आहे. याबाबतची तक्रार आधार सेवेच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे, असे पोस्टातील सूत्रांनी सांगितले. सर्व्हरच्या अडचणीमुळे जीपीओतील सेवा सुरू होण्यास आणखी काही दिवस लागतील, असेही समजते.

Web Title: mumbai news post office aadhar card