दिवाळीत सुट्टीच्या काळातही पोस्टमन करणार काम! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

मुंबई - दिवाळीत "पोस्त' मागणारे पोस्टमन यंदा दिवाळीच्या सुट्टीतही काम करणार आहेत. पोस्टाच्या योजना ते नागरिकांपर्यंत पोहचवणार आहेत. विशेष म्हणजे यंदा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनसामान्यांना शुभेच्छापत्रे देऊन सेल्फी काढण्याची विशेष मोहीम पोस्टमननी हाती घेतली आहे. शुभेच्छापत्रांसह पोस्टाच्या विविध योजनांचे पत्रकही देण्यात येणार आहे. 

पोस्टाने बचतीच्या अनेक योजना आखल्या आहेत. या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम पोस्टमन करतील. 150 पोस्टमनमार्फत मशीद बंदरपासून दादरपर्यंत पूर्व विभागात ही मोहीम राबवण्यात येईल. दिवाळीत एक दिवसही सुट्टी न घेता ते काम करणार आहेत, अशी माहिती पोस्टाच्या मुंबई पूर्व विभागाचे वरिष्ठ अधीक्षक आय. डी. पाटील यांनी दिली. ऍण्टॉप हिल, वडाळा, शिवडी, माझगाव, परळ, दादर येथील पोस्टमन या मोहिमेत सहभागी होतील. स्थानिक आमदार, खासदार व नगरसेवकांना शुभेच्छापत्र देऊन त्यांच्यासोबत सेल्फीही काढतील. प्रत्येक पोस्टमन ओळखीच्या नागरिकांची किमान 10 बचत खाती उघडण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी एक हजार पत्रके छापण्यात आली आहेत. 

बचत खाते, मासिक उत्पन्न योजना, आवर्ती (रिकरिंग) जमा खाते, वरिष्ठ नागरिक योजना, सुकन्या समृद्धी योजना, वरिष्ठ नागरिक योजना, पाच वर्षीय राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, मुदत ठेव योजना, सार्वजनिक भविष्य निधी खाते, अटल पेन्शन योजना, डाक जीवन विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांसारख्या योजना टपाल खाते राबवत आहे.

Web Title: mumbai news postman