कैदी मंजुळा शेट्येवर लैंगिक अत्याचार नाही?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. लैंगिक अत्याचार झाल्याचे 23 आणि 24 जूनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नसल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

मरियम शेख हिच्या तक्रारीनुसार, 23 जुलैला सकाळी बराकीच्या बाहेर मंजुळाला मारहाण करण्यात आली. मारहाणीचा आवाज बराकीपर्यंत येत होता. मारहाणीनंतर मानेभोवती साडी गुंडाळून मंजुळाला ओढत बराकीत आणण्यात आले. दुपारी 12 वाजता मंजुळाला बराक क्रमांक 5 मध्ये मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला होता, असेही या तक्रारीत म्हटले होते; परंतु गुन्हे शाखेला सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे काही आढळले नसल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या अहवालातही मंजुळाच्या गुप्त भागांजवळ कोणत्याही जुन्या जखमांचे वण किंवा नव्या जखमा नसल्याचे नमूद केले होते. तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकरसह गार्ड वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे व बिंदू नायकोडे या अटकेतील आरोपींनीही लैंगिक अत्याचार नसल्याचे चौकशीत म्हटले होते.

Web Title: mumbai news Prisoner Manjula Shetye is not sex oppressors?