मालमत्ता कर भरण्यासाठी लोकसंख्येपेक्षाही जास्त एसएमएस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

मुंबई - मुंबईत सहा लाख 62 हजार 172 मालमत्ता असताना जुन्या नोटांद्वारे मालमत्ता कर भरण्याचे एसएमएस मालमत्ताधारकांना पाठवण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीने एक कोटी 60 लाख लघुसंदेश पाठवण्याची किमया केली आहे. ही संख्या मुंबईच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. 

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी (ता.9) झालेल्या बैठकीत प्रशासनाच्या या अजब कारभाराने सर्वच सदस्य थक्क झाले. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर जुन्या नोटांनी मालमत्ता कर भरण्याची सवलत पालिकेने दिली होती. त्यासाठी एकगठ्ठा एसएमएस पाठवण्याचे कंत्राट एम. एमगेज कंपनीला देण्यात आले होते. एका एसएमएससाठी साडेआठ रुपये अशा दराने प्रशासनाने एम. एमगेज कंपनीला 15 कोटी 63 लाख रुपये मोजले आहेत. या खर्चाला स्थायी समितीने कार्योत्तर मंजुरी दिली. 

कोरगावकरांची चलाखी 
एसएमएस कंपन्या असताना महागड्या दराने एम. एमगेज कंपनीला कंत्राट देण्याची गरज होती का, असा सवाल शिवसेनेचे मंगेश सातमकर, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केला. लोकसंख्येपेक्षा आणि मालमत्तांपेक्षा जास्त एसएमएस कुणाला पाठवले, असेही त्यांनी विचारले. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र चौकशीच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सुधार समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हा प्रस्ताव चलाखीने मंजूर करून घेतला.

Web Title: mumbai news Property taxes SMS