महापौर निवासस्थानाचे आरक्षण बलण्याचा प्रस्ताव

महापौर निवासस्थानाचे आरक्षण बलण्याचा प्रस्ताव

मुंबई - दादर येथील महापौर निवासस्थानाचे आरक्षण बदलून "स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक' असे आरक्षण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सुधार समितीत मांडला आहे. त्यामुळे महापौर निवासस्थानाच्या भूखंडावर असलेले रस्त्याचे आरक्षणही रद्द होण्याची शक्‍यता आहे.

महापौर निवासस्थानात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या भूखंडावर "महापौर निवासस्थान' असे आरक्षण आहे. तसेच, या निवासस्थानाच्या परिसराचा 42.60 मीटरचा भाग हा रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. स्मारक बांधण्यासाठी भूखंडाच्या आरक्षणात बदल करणे आवश्‍यक आहे. या संदर्भातील प्रस्ताव पालिकेने सुधार समितीत मांडला आहे. सुधार समितीबरोबरच महासभेची परवानगी मिळाल्यानंतर आरक्षण बदलण्यात येणार आहे. या बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर शिफारस राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला केली जाणार आहे. त्यानंतर त्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या जाण्याची शक्‍यता आहे.

आरक्षण बदलणे आवश्‍यक
महापौर निवासस्थान सागरी किनारा संरक्षण क्षेत्रात आहे. हे आरक्षण बदलल्यानंतर कायद्यानुसार परिसरात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी आवश्‍यक राहील, असे प्रशासनाने या प्रस्तावात नमूद केले आहे. राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण विभागाकडे "सीआरझेड' अंतर्गत परवानगी मिळवण्याचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवला आहे. त्यामुळे आरक्षण बदलल्यास स्मारक उभारण्याच्या कामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com