नक्षलवाद्यांपासून संरक्षण देऊ - माथूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - नक्षलवाद्यांना विरोध करणाऱ्या, आमच्या जवानांना प्रोत्साहन देणाऱ्यांना आणि आम्हाला मदत करणाऱ्या सर्वांना आम्ही संरक्षण देऊ, असे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले. अभिनेता अक्षयकुमार आणि त्याच्या कुटुंबीयांना नक्षलवाद्यांनी पत्राद्वारे धमकी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे जाहीर केले आहे.

सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करणारा अभिनेता अक्षयकुमार आणि बॅडमिंटनपटू साईना नेहवाल यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. मृत जवानांच्या कुटुंबांना मदत करणे बंद करा; अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील, अशा धमकीची पत्रके "पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी'ने प्रसिद्ध केली आहेत. त्यानंतर माथूर यांनी अक्षयकुमारला पाठिंबा देऊन त्याच्या सुरक्षेबाबत हे वक्तव्य केले.

Web Title: mumbai news Protecting the Naxals