"वन अबोव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी तेथील "वन अबोव्ह' पबचे मालक क्रिपेश सिंघवी, जिगर संघवी आणि अभिषेक मानकर यांना अटक करण्यात पोलिसांना 14 दिवसांनी यश आले. त्यापैकी संघवी बंधूंना जुहू येथून अटक करण्यात आली. या तिघांचा शोध ज्या विशाल कारियामुळे लागला, त्याला 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

कमला मिल कंपाउंडमधील वन अबोव्ह आणि मोजोस या पबना लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. आगीचे वृत्त समजताच अभिषेक घटनास्थळी आला होता; मात्र मृतांचा आकडा वाढू लागल्यानंतर त्याने दूरध्वनी करून विशालला बोलावून घेतले होते. काही वेळाने अंधेरी येथून कमला मिल कंपाउंडमध्ये आलेल्या विशालसोबत ते वरळीतील अभिषेकच्या घरी गेले. तेव्हापासून "वन अबोव्ह' पबचे तिन्ही मालक गायब झाले होते. 

पोलिस संघवी बंधू आणि अभिषेकचा शोध घेत असल्याचे समजल्यानंतर ते तिघेही माझ्या घरी आश्रयाला आले, अशी कबुली कारियाने पोलिसांना दिली आहे. संघवी बंधू वांद्रे रिक्‍लेमेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी बुधवारी रात्री त्यांना अटक केली, तर अभिषेकला करियाच्या घराजवळूनच अटक करण्यात आली. 

Web Title: mumbai news pub owners arrested