पुणे-लातूर "शिवशाही' बससेवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

मुंबई - एसटी महामंडळाने मुंबई ते रत्नागिरी मार्गावर एसी "शिवशाही' बससेवा नुकतीच सुरू केली. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता पुणे ते लातूरसाठी उद्यापासून (ता. 17) एसी शिवशाही बस सुरू होणार आहे.

पुण्यातील शिवाजीनगर येथून सकाळी 8 वाजता एसी शिवशाही बस सुटेल. इंदापूर, टेंभुर्णी, कुर्डुवाडी, बार्शी, एडशी, मुरूडमार्गे लातूरला दुपारी 4 वाजता बस पोचेल; तर लातूरहून रात्री 11 वाजता बस निघून बार्शी, इंदापूरमार्गे शिवाजीनगर येथे पहाटे 6 वाजता शिवशाही बस पोचेल. या बसचे तिकीट प्रति प्रवासी 501 रुपये असल्याची माहीती एसटी महामंडळाने दिली. बसमधील तिकीट आरक्षण शनिवारपासून एसटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

Web Title: mumbai news pune-latur shivshahi bus