मध्य रेल्वेला महिनाभरात नवीन सिमेन्स लोकल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावर दोन नवीन सिमेन्स लोकल तीन महिन्यांपूर्वी दाखल झाल्या आहेत. आता अखेरची अशी लोकल महिन्याभरात मुंबईत दाखल होणार आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावर दोन नवीन सिमेन्स लोकल तीन महिन्यांपूर्वी दाखल झाल्या आहेत. आता अखेरची अशी लोकल महिन्याभरात मुंबईत दाखल होणार आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

मध्य रेल्वे मार्गावर 122 लोकल आहेत. त्यांच्या दिवसाला सुमारे 1 हजार 600 फेऱ्या होतात. या पैकी 70 लोकल सिमेन्स कंपनीने तयार केलेल्या आहेत; तर उर्वरित लोकल रेट्रोफिटेड आणि बीएचईएलच्या आहेत; परंतु पश्‍चिम रेल्वेवर नुकत्याच 72 नवीन बम्बार्डियर लोकल दाखल करण्यात झाल्या असून, या मार्गावर धावणाऱ्या सिमेन्स लोकल मध्य रेल्वेकडेही वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिमेन्स लोकलच्या संख्येत मोठी भर पडली आहे. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या जुन्या लोकल टप्प्याटप्यात बाद करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी एमयूटीपी 1 अंतर्गत नव्या सिमेन्स लोकल मध्य व पश्‍चिम रेल्वेला मिळत होत्या. 2011 पर्यंत नव्या सिमेन्स लोकल दाखल झाल्यानंतर यातील तीन लोकल काही तांत्रिकमुळे मध्ये रेल्वेच्या ताफ्यात आल्या नव्हत्य. चेन्नईतील आयसीएफमध्ये त्याची बांधणी करून त्या लोकल मध्य रेल्वेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतर सिमेन्सऐवजी बम्बार्डियर लोकल फॅक्‍टरीतून पश्‍चिम रेल्वेवर दाखल करण्याचा निर्णय घेतला व सिमेन्स लोकल येणे थांबले. मात्र, पुन्हा उर्वरित तीन सिमेन्स कंपनीच्या लोकल दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील दोन लोकल मार्च महिन्यापर्यंत मध्य रेल्वेत आल्या. आता एक लोकल महिन्याभरात मध्य रेल्वेत चैन्नईमधून येईल, अशी माहीती देण्यात आली.

Web Title: mumbai news railway