मुंबईतील रेल्वे पुलांची कॉंग्रेसकडून पाहणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन व परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाल्याच्या प्रकरणावरून बराच राजकीय वादंग झाल्यानंतर शहरातील रेल्वे पुलांच्या सुरक्षेची पाहणी करण्यासाठी आता कॉंग्रेस सरसावली आहे. कॉंग्रेसचे नेते बुधवारी (ता. 18) करी रोड पुलापासून पाहणी दौरा सुरू करणार आहेत. 

एल्फिन्स्टन रोड येथील रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर काही दिवसांतच चर्नी रोड येथील रेल्वे पुलाच्या पायऱ्या कोसळून दोन प्रवासी जखमी झाले. या दोन्ही घटनांनंतर रेल्वे प्रशासन सुस्त असल्याचा आरोप मुंबई कॉंग्रेसने केला आहे.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्‍चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता. आता कॉंग्रेसही याबाबत आक्रमक झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे नेते मुंबईतील सर्व रेल्वे पुलांची पाहणी करणार आहेत. त्याची सुरवात बुधवारी दुपारी चार वाजता करी रोडपासून होईल. 

Web Title: mumbai news railway bridge congress