साडेतीन तासांनंतर लोकलसेवा सुरळीत; विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन

मंगळवार, 20 मार्च 2018

विद्यार्थ्यांचे आंदोलन एवढे चिघळले असताना एकही लोकप्रतिनिधी याठिकाणी पोचलेला नव्हता. भाजप खासदारांनीही सावध भूमिका घेत रेल्वे मंत्र्यांशी या विषयावर चर्चा करू असे सांगितले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मी हा प्रश्न संसदेत उपस्थित करणार असल्याचे सांगितेल. तसेच रेल्वे मंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले. मनसेने अखेर या आंदोलनात उडी घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. अखेर आंदोलन मागे घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली.

मुंबई : रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. विद्यार्थ्यांनी माटुंगा येथे लोकल वाहतूक रोखून धरली होती. माटुंगा येथे विद्यार्थ्यांनी लोकलसेवा रोखून धरल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटविण्यासाठी लाठीमार करावा लागला होता, तसेच दगडफेकही झाली होती. या लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमीही झाले होते. लोकलसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

आज सकाळी सात वाजल्यापासून माटुंगा येथे आंदोलनाला सुरवात झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सरकारला कोणतीही पूर्व कल्पना नव्हती का याबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर आरोप केले. सुरवातीला रेल्वे प्रशासनातील एकही अधिकारी या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेला नव्हता. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळले. विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅकवरच ठिय्या मांडल्याने वाहतूक होऊ शकली नाही. पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटविण्यासाठी लाठीमार केला. यात विद्यार्थी जखमी झाले.

विद्यार्थ्यांचे आंदोलन एवढे चिघळले असताना एकही लोकप्रतिनिधी याठिकाणी पोचलेला नव्हता. भाजप खासदारांनीही सावध भूमिका घेत रेल्वे मंत्र्यांशी या विषयावर चर्चा करू असे सांगितले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मी हा प्रश्न संसदेत उपस्थित करणार असल्याचे सांगितेल. तसेच रेल्वे मंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले. मनसेने अखेर या आंदोलनात उडी घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. अखेर आंदोलन मागे घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली.

माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने नागरिक चालत हे अंतर पार करत होते. रेल्वे प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.  

काय आहेत रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या मागण्या ?
- रेल्वेत अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के असलेला कोटा रद्द करावा
- रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे
- रेल्वे अॅप्रेंटिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार - रेल्वेत सामावून घ्यावे, त्याप्रमाणेच भविष्यातही तोच नियम कायम ठेवावा
यासंदर्भात महिन्याभरात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करू नये.

Web Title: Mumbai news railway exam students agitation in Dadar