गणेशोत्सवानिमित्त रेल्वेगाड्या "फुल'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे गाड्यांच्या तिकिटांसाठी झुंबड उडाली आहे. मांडवी एक्‍स्प्रेस "फुल' झाली आहे. आरक्षित तिकिटांची प्रतीक्षा यादी 450च्या वर पोचली आहे. याचा फायदा खासगी बस कंपन्यांना होत आहे.

गणेशोत्सवानिमित्त मध्य व कोकण रेल्वेने गाड्यांचे नियोजन केले आहे. काही जादा गाड्या या दिवसांत या मार्गावर धावतील. रेल्वेने तीन महिन्यांपूर्वी तिकिटांच्या आरक्षणाची सुविधा सुरू केली आहे. मागणी जास्त असल्याने प्रतीक्षा यादी वाढली आहे.

Web Title: mumbai news railway full for ganeshotsav