रेल्वे प्रवासात ई आधारही ग्राह्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - लांब पल्ल्याच्या गाड्यांतून आरक्षित तिकिटांवर प्रवास करताना यापुढे ई आधारही ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. प्रवासादरम्यान प्रिंटेट आधार कार्डबरोबरच प्रवाशांनी मोबाईलवर डाऊनलोड केलेले आधार कार्डही चालेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मेल, एक्‍स्प्रेसमधून प्रवास करताना मतदान ओळखपत्र, प्रिंटेड आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे पासबुक, बॅंकांकडून देण्यात आलेले लॅमिनेटेड फोटो असलेले ओळखपत्र, फोटोसह शिधापत्रिका यापैकी एक ओळखपत्र लागते. त्यात आता ई आधारचा समावेश करण्यात आला आहे.
Web Title: mumbai news railway journey e-aadhar