रेल्वेत महिलांना गुप्तांग दाखविणारा अटकेत

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई : साएसएमटी येथे चालत्या रेल्वेत महिलांना गुप्तांग दाखवून अश्लील चाळे करणाऱ्यास रेल्वे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यामुळे महिला प्रवाशांत रेल्वे पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाला आहे.

मुंबई : साएसएमटी येथे चालत्या रेल्वेत महिलांना गुप्तांग दाखवून अश्लील चाळे करणाऱ्यास रेल्वे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यामुळे महिला प्रवाशांत रेल्वे पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाला आहे.

सीएसएमटी येथून शनिवारी (ता. 21) सकाळी 10 ते 10:03 दरम्यान फलाट क्रमांक 1 वरुन सुटलेल्या बेलापूर लोकल गाडीत महिला डब्यातील प्रवासी महिलांना शेजारील दिव्यांग डब्यातून बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या तरुणाने मस्जिद बंदर स्टेशन दरम्यान जाळीतून आपले गुप्तांग दाखवीत अश्लील हावभाव करीत महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. या प्रकाराने भेदरलेल्या महिला प्रवाशांनी संयम दाखवत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय शिंदे यांनी अज्ञात व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात रेल्वे पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी आदेश देत उपायुक्त पुरुषोत्तम कराड आणि सहाय्यक आयुक्त मछिंद्र चव्हाण यांना विशेष लक्ष देऊन तपास करण्यास सांगितले.

फिर्यादी महिलांनी दिलेल्या तक्रारीतील वर्णना नुसार आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांनी विविध पथके तयार केली. शिवाय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती नुसार आरोपी धन्यवाद गेट समोर आला त्याला अटक केली. कृपा भोदेबा पटेल (वय 30) असे त्याचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय शिंदे, निरीक्षक विलास चौघुले, उपनिरीक्षक आर. एस. भद्रशेट्टे, घोरपडे, डी. एस. सरक, गावकर आणि पोलिस अंमलदार निकम, सानप आणि पाटील यांनी विशेष परिश्रम घेत या गंभीर गुह्याची उकल केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
Web Title: mumbai news railway police one areested