लोकलमध्ये अश्‍लील वर्तन करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई - लोकलमधील अपंगांच्या डब्यामध्ये महिलेकडे पाहून अश्‍लील वर्तन करणाऱ्याला सीएसटी रेल्वे पोलिसांनी अटक केली. कृपा भोदेबा पटेल असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

मुंबई - लोकलमधील अपंगांच्या डब्यामध्ये महिलेकडे पाहून अश्‍लील वर्तन करणाऱ्याला सीएसटी रेल्वे पोलिसांनी अटक केली. कृपा भोदेबा पटेल असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

तक्रारदार महिला नवी मुंबईत नोकरी करते. शनिवारी (ता. 21) भाऊबिजेसाठी त्या माहेरी आल्या होत्या. सकाळी त्यांनी सीएसटीहून पनवेलला जाणारी लोकल पकडली. सुटी असल्याने महिलांच्या डब्यामध्ये फारशी गर्दी नव्हती. लोकल मश्‍जिद बंदर रेल्वे स्थानकात आली. त्या वेळी पटेल अपंगाच्या डब्यात बसला होता. लोकल सुरू होताच त्याने तक्रारदार महिलेकडे पाहून अश्‍लील वर्तन करण्यास सुरवात केली. त्यामुळे महिला घाबरली. ती सॅंडहर्स्ट रोड स्थानकात उतरली आणि तिने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तपासासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली.

वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे, पोलिस निरीक्षक विलास चौगुले यांच्या पथकाने काही तास सीएसटी ते मश्‍जिद बंदर स्थानकांतील सीसी टीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात पटेल दिसला. त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेल्या सुमारे 150 हून अधिक जणांची पोलिसांनी ओळख परेड घेतली. आरोपीच्या शोधाकरिता स्थानक परिसरात विशेष मोहीमही राबवण्यात आली. अखेर पोलिसांनी सीएसटी परिसरातून पटेलला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पटेल मूळ ओरिसाचा रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी तो मुंबईत आला होता. तो मश्‍जिद बंदर परिसरात मजुरीचे काम करायचा.

Web Title: mumbai news railway police one areested