मध्य, पश्‍चिम रेल्वेस्थानकांत लवकरच 44 पादचारी पूल 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या ग्रॅण्ट रोड, वांद्रे, मरीन लाइन्स, चर्नी रोड अशा 24; तर मध्य रेल्वेवर कुर्ला, वडाळा, विक्रोळी आदी महत्त्वाच्या 20 स्थानकांत वर्षभरात पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. त्यांचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. 

एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेवरील अपुऱ्या व अरुंद पुलांचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते. त्यानुसार वर्षभरात 44 पूल बांधण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती संख्या पाहता, पुलांची संख्या वाढवण्यासोबत रेल्वेमंत्र्यांनी मुंबईतील विविध स्थानकांवरील नवीन पादचारी पूल बांधण्यास मंजुरी दिली. 

मध्य आणि पश्‍चिम रेल्वेमार्गावरून दिवसाला सुमारे 75 ते 80 लाख जण प्रवास करतात. या प्रवाशांची सर्वाधिक गर्दी पादचारी पुलांवरच होते. अपुऱ्या आणि अरुंद पुलांवरून प्रवाशांना चालणेही कठीण होते. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर घडलेल्या घटनेनंतर प्रवाशांच्या पुलांवरील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे.

Web Title: mumbai news railway station