प्रशिक्षणार्थींच्या नियुक्तीबाबत सकारात्मक निर्णय!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - रेल्वे सेवेत सामावून घेण्यासाठी मुंबईत आंदोलन करणाऱ्या रेल्वेच्या प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी नवी दिल्लीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली.

लवकरच होणाऱ्या नोकरभरतीत रेल्वे बोर्डाने ठरवलेल्या 20 टक्के राखीव कोट्याअंतर्गत या प्रशिक्षणार्थींना सामावून घेण्याचे, प्रशिक्षणार्थींच्या नियुक्तीबाबत सप्टेंबर 2017 मध्ये घेतलेल्या निर्णयाला अधीन राहून सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचे आश्‍वासन गोयल यांनी या शिष्टमंडळाला दिले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीश सावंत, सरचिटणीस मनोज चव्हाण, संदीप देशपांडे, मनसे रेल्वे सेनेचे सरचिटणीस जितू पाटील आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मंगळवारी मध्य रेल्वेवरील दादर ते माटुंगा स्थानकांदरम्यान आंदोलन केले होते.

Web Title: mumbai news railway trainees selection decission