तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 88.40 मिलीमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांत एकूण 88.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली. हा पाऊस बोनस ठरला आहे.

मुंबई - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांत एकूण 88.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली. हा पाऊस बोनस ठरला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात आता 2 लाख 89 हजार 392 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो जूनच्या पहिल्या आठवड्यात 1 लाख 71 हजार 419 दक्षलक्ष लिटर होता. गेल्या वर्षी दमदार पाऊस पडल्यामुळे यंदा तलावांच्या पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. गेल्या 24 तासांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी पाच तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला.

तलाव क्षेत्रात 24 तासांत पडलेला पाऊस
तलावाचे नाव पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये सध्या तलावातील साठा
(दक्षलक्ष लिटर )
अप्पर वैतरणा

मोडकसागर 16 .60 37180
तानसा 13 .00 33290
मध्य वैतरणा 18 . 00 90528
भातसा 18 .00 118983
विहार 32 . 80 6878
तुलसी ----- 2533
एकूण 88 . 40 289392

Web Title: mumbai news rain in lake area