अर्धा तास पावसात राहिल्यास लेप्टो!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

मुंबई - पावसाचे मुंबईत दमदार आगमन झाले असले, तरी आता साथीच्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्यात अर्धा तासाहून अधिक वेळ राहिल्यास लेप्टो होऊ शकतो, अशी शक्‍यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी पालिका रुग्णालयांत प्रतिबंधात्मक औषधे घ्यावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

उंदीर किंवा रोगी प्राण्यांचे मलमूत्र पाण्यात मिसळल्यास त्या पाण्यामुळे लेप्टोचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचे जंतू जखमेद्वारे शरीरात जातात. त्यामुळे पावसाच्या पाण्यात अर्ध्या तासाहून अधिक वेळ राहिलेल्या मुंबईकरांनी पालिका रुग्णालयांत प्रतिबंधात्मक औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाय (डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार)
पावसामुळे साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागल्यास २४ ते ७२ तासांच्या आत डॉक्‍सिसायक्‍लीन या गोळीचा २०० मिलीग्रॅमचा एक डोस घ्यावा. 
गरोदर महिलांनी अझिथ्रोमायसिन या गोळीचा ५०० मिलीग्रॅमचा एक डोस घ्यावा. 
आठ वर्षांखालील मुलांनी अझिथ्रोमायसिन या गोळीचा २५० मिलीग्रॅमचा एक डोस घ्यावा.

अशी घ्या काळजी...
पायावर जखम असल्यास पाण्यात जाणे टाळावे. गमबूटचा वापर करावा. 
साचलेल्या पाण्यातून चालल्यास पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. 
ताप आल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. पालिकेच्या दवाखान्यात, रुग्णालयांत औषधोपचार घ्यावेत.

Web Title: mumbai news rain Lepto bacterial disease