भाजीपाला आवक पावसामुळे घटली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

नवी मुंबई - ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारातील आवक आज घटली. 

कांदा-बटाटा बाजारात आज केवळ ६० गाड्यांची आवक झाली. नेहमी कांद्याच्या १२५ आणि बटाट्याच्या ८० ते ९० गाड्यांची आवक होते. मात्र, आज कांदा व बटाट्याच्या प्रत्येकी ३० गाड्या बाजारात आल्या. मात्र, बाजारात दर स्थिर राहिल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. भाजीपाला बाजारातही आवक काही प्रमाणात घटली. दररोज येणाऱ्या ६५० गाड्यांऐवजी आज ५५० गाड्यांमधून भाजीपाला बाजारात आला. 

Web Title: mumbai news rain vegetables