राम नाईक यांच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या गोरेगाव येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी (ता. 30) पहाटे चोरीचा प्रयत्न झाला. शेजारील रहिवाशांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुंबई - उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या गोरेगाव येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी (ता. 30) पहाटे चोरीचा प्रयत्न झाला. शेजारील रहिवाशांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

उत्तर मुंबईचे खासदार राहिलेल्या नाईक यांचे गोरेगावातील जयप्रकाशनगर येथे संपर्क कार्यालय आहे. तेथे आज पहाटे तीन चोरांनी दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. शेजारी राहणाऱ्यांना जाग आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिस येईपर्यंत त्यांनी अन्य शेजाऱ्यांनाही कळवले; बरेच जण तेथे आले. या वेळी त्यांची चोरट्यांशी झटापट झाली आणि त्यात दोघे चोरटे पळून गेले; मात्र रहिवाशांनी तिसऱ्या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याच ठिकाणी 16 वर्षांपूर्वी नाईक राहत असताना चोरीचा प्रयत्न झाला होता.

Web Title: mumbai news ram naik office theft