रानसई धरण ओव्हरफ्लो

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

उरण - रानसई धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे उरण तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात जवळजवळ ८०० मिलीमीटर पाऊस झाला. सध्या या धरणाची पाण्याची पातळी ११६.५ फुटांच्या वरती असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.

रानसई धरणाची उंची १२० फूट जरी असली तरी धरणाची पाण्याची पातळी ११६.५ फूट एवढी झाली, की हे धरण ओसंडून वाहू लागते. अर्ध्याअधिक उरण तालुक्‍याची तहान रानसई धरण भागवते. रानसई धरणातून सध्या उरण नगरपालिका, २१ गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता १० एमसीएम एवढी आहे. यंदा जून महिन्यात या धरणाच्या पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे एमआयडीसीने धरणाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू केला होता. त्यामुळे तालुक्‍यात दोन दिवस पाणी कपात करण्यात येत होती. आता धरण भरले असल्यामुळे उरणची पाणी कपात कमी करण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news Ransai dam overflow