मोपलवारांवरील आरोपाच्या चौकशी समितीत रावसाहेब शिंदे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक (एमडी) राधेश्‍याम मोपलवार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीत अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त प्रवीण पडवळ यांच्या जागी अपर पोलिस आयुक्‍त रावसाहेब शिंदे यांची सरकारने नियुक्‍ती केली आहे. पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत मोपलवार यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये पडवळ यांची सदस्य म्हणून नियुक्‍ती करण्यात आली होती. मात्र आज पडवळ यांच्या जागी शिंदे यांची नियुक्‍ती करण्यात आलेला शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. समृद्धी महामार्ग आणि इतर कामे हाताळणे आणि मोपलवार यांच्यावरील आरोप यांचा काही संबंध आहे का? याबाबत चौकशी करण्याची समितीची कार्यकक्षा आहे.
Web Title: mumbai news Raosaheb Shinde in the Investigation Committee on Moplawar