काकाचा पुतणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - काकाने पुतणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. तो सात वर्षांपासून बलात्कार करीत होता. पीडित 14 वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. ती सात वर्षांची असल्यापासून तिचा काका तिच्यावर अत्याचार करीत होता. ही माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली होती. त्यामुळे ही पीडित मुलगी घाबरली होती.

एका गुन्ह्यात या आरोपी काकाला अटक झाली होती. जामिनावर बाहेर येताच, त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. अखेर हा अत्याचार सहन न झाल्याने, तिने याबाबत माहिती शेजाऱ्यांना देताच त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: mumbai news rape