कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

मुंबई: रस्त्यावरील कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला विकृताला पवई पोलिसांनी अटक केली. कुलदीप असे या आरोपीचे नाव आहे. ऑगस्ट महिन्यात या परिसरात दोन अल्पवयीन मुलांना धमकावून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याने, त्या दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केली होती. त्यांच्यापैकी एकाच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार केली आहे.

पवईच्या गौतमनगर परिसरात राहणारे विजय (नाव बदललेले आहे) शुक्रवारी त्यांच्या घराच्या गॅलरीत उभे होते. त्यावेळी इमारती खालून आरोपी कुलदीप हा एका कुत्र्याला घेऊन जाताना त्यांना दिसला. तो कुत्रा मेलेला असावा त्यामुळे त्याला फेकण्यासाठी कुलदीप निघाला असवा, असे विजय यांना वाटले. मात्र, त्याने हा कुत्रा इमारतीच्या जवळ फेकल्यास परिसरात दुर्गंधी पसरेल, त्यामुळे कुलदीपला तो कुत्रा लांब फेक असे सांगण्यासाठी विजय इमारतीमधील एका सहकाऱ्याला घेऊन त्याच्या मागे गेले. त्यावेळी कुलदीप त्या कुत्र्याला घेऊन जवळील शौचालयात गेला.

शौचालयात कुत्र्यावर अत्याचार करताना त्याला विजय आणि शेजाऱ्यांनी पकडले. कुलदीपच्या या विकृतीची माहिती त्यांनी पवई पोलिसांना दिली. या पूर्वी याच भागात विजय यांच्या मुलासह अन्य एका मुलावर अज्ञात व्यक्तीं अनैसर्गिक अत्याचार करायचा. या भितीपोटी त्या दोन्ही मुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. अशातच कुलदीपचा हा विकृत प्रकार धोकादायक वाटल्याने पवई पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.

Web Title: mumbai news rape in dog