माहिती आयुक्त गायकवाड निवृत्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

मुंबई - राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड सोमवारी निवृत्त झाले. मुंबईच्या माहिती आयुक्तपदावर कार्यरत असलेले अजितकुमार जैन यांच्याकडे मंगळवारपासून (ता. 30) अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य सचिव म्हणून गायकवाड यांची कारकीर्द चांगली राहिली. कॉंग्रेस आघाडी सरकारने मुंबई परिसरातील शहराचा विकास करण्यासाठी स्थापन केलेल्या "एमएमआरडीए'च्या आयुक्तपदी 2007 ते 2010 या कालावधीत त्यांनी काम केले होते. 1975 च्या "आयएएस' तुकडीचे अधिकारी असलेल्या गायकवाड यांनी उत्पादन शुल्क विभागाचे मुख्य सचिव, "यशदा'चे महासंचालक, गडचिरोली, सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आयुक्त, मुंबई महापालिकेत अतिरिक्त पालिका आयुक्त आदी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. गायकवाड निवृत्तीनंतर राजकारणात जाण्याची शक्‍यता वर्तवली जात असून, ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता आहे.
Web Title: mumbai news ratnakar gaikwad retire