पुनर्वसनासाठी भूखंडांचा विचार करण्याची सूचना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - तानसा जलवाहिनीच्या परिसरातील झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी पश्‍चिम उपनगरामधील दोन भूखंडांचा विचार करा आणि झोपड्या हटविण्याची कारवाईही सुरूच ठेवा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या परिसरातील झोपड्या हटविण्याचे आदेश न्यायालयाने यापूर्वी दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यामुळे विस्थापित झालेल्या काही झोपडीधारकांना माहुल येथील संक्रमण शिबिरामध्ये जागा देण्यात आली आहे. मात्र, अजूनही हजारो झोपडीधारकांचे पुनर्वसन झाले नाही. याबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हे निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी 20 एप्रिलला होणार आहे.
Web Title: mumbai news rehabilitation land