महसूलमंत्र्यांचे ट्विटर अकाउंट हॅक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई - राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे बुधवारी उघड झाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिस शाखेकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मुंबई - राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे बुधवारी उघड झाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिस शाखेकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पाटील यांनी 2014 मध्ये ट्विटर अकाउंट सुरू केले. त्यांचे ट्‌विटरवर 13 हजार फॉलोअर्स आहेत. मंत्रालयातील महत्त्वाच्या चर्चा, निर्णय जनतेपर्यंत पोचवण्याचे काम पाटील यांच्या वतीने त्यांची खासगी टीम करते. मंगळवारी (ता. 6) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका करणारे ट्‌विट केले होते. काही वेळाने पाटील यांच्या अकाउंटवरून त्या ट्‌विटला लाइक करण्यात आले. हा प्रकार पाटील यांचे ट्‌विटर हॅंडल करणाऱ्या टीमच्या लक्षात आल्यानंतर हे अकाउंट हॅक झाल्याचे उघड झाले. दरम्यान, "माझे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यामुळे त्यावरून कोणत्याही पोस्टना केले गेलेले लाइक किंवा रि-ट्विट ग्राह्य धरू नये' असे आवाहन पाटील केले आहे.

Web Title: mumbai news revenue minister chandrakant patil twitter account hack