राज्यशास्त्र पुस्तकासाठी योग्य संशोधनाचा दावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबई - नववीच्या राज्यशास्त्र अभ्यासक्रमाचे पुस्तक प्रसिद्ध करण्यापूर्वी मुबलक आणि योग्य संशोधन केले आहे, असा दावा राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन विभागाने मुंबई उच्च न्यायालयात केला.

अभ्यासक्रमातील "ऑपरेशन ब्ल्यू स्टार' या घटनेच्या संदर्भाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. याबाबत न्यायालयात विभागाच्या वतीने नुकतेच प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. ऑपरेशन ब्ल्यू स्टारमधील जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा उल्लेख अयोग्य रीतीने केल्याचा दावा याचिकादारांनी केला आहे; मात्र हा दावा विभागाने अमान्य केला. पुस्तकाची रचना ज्येष्ठ अभ्यासक गणेश राऊत यांनी केली आहे. त्यावर सुमारे 30 अभ्यासकांनी छाननी केली आणि मसुदा अंतिम केला, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याबाबत सर्व संदर्भांची छाननी केली आहे, असेही विभागाचे म्हणणे आहे. याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होईल.

Web Title: mumbai news The right research claim for the book of 12/5000 Rājyaśāstra Political Science