ऍड. रिझवान सिद्दीकींची सुटका करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात ऍड. रिझवान सिद्दीकी यांना ठाणे पोलिसांनी केलेली अटक बेकायदा आहे, असे स्पष्ट सुनावताच त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. कायद्यापेक्षा पोलिस मोठे आहेत का, असा प्रश्‍नही न्यायालयाने केला.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या सीडीआरप्रकरणी ठाणे पोलिसांनी सिद्दीकी यांना अटक केली होती; मात्र त्यांची अटक नियमांनुसार झालेली नाही, असा दावा करणारी हेबिअस कॉर्प्स याचिका सिद्दीकी यांच्या पत्नीने न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ठाणे पोलिसांनी सिद्दीकींना अटक करताना कायद्याचे पालन केलेले नाही.

ही कारवाई करणाऱ्या पोलिसांची गृह विभाग आणि ठाणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. तुम्ही त्यांना सोडणार आहात की आम्ही आदेश देऊ, असा प्रश्‍नही न्यायालयाने सरकारला केला. त्यावर सिद्दीकी यांना सोडण्याची तयारी राज्य सरकारकडून दर्शवण्यात आली.

Web Title: mumbai news rizwan siddiqui release court