'ताड़देव येथील घाडीगावकर मार्गाचे रुंदीकरण करा; अन्यथा उपोषण' 

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

नागरिकांना आणि वाहतुकिस हा रस्ता निर्माण झाल्यास फारच सोईचे होईल परंतु हे काही होत नाही.सदर रस्ता बांधण्याकरिता महापालिका परिरक्षण विभागाने आराखडा नुसार नियोजित केलेली राखीव असलेली पालिकेची  जागा मोकळी करण्यात आलेली नसून त्या जागेवर ठक्कर टावर सोसायटीने  अनधिकृतरित्या ताबा घातला आहे.नेमका याच जागेवरुन महानगर पालिकेने नवीन मार्ग(रस्ता)   बांधण्यासाठी दोन जुनी झाडे तोडली होती.परंतु अजूनही तेथून रस्ता का बनविण्यात आलेला नाही.मग झाडे का तोडली?

मुंबई: दक्षिण मुंबईतील ताड़देव आरटीओ समोरील ठक्कर टॉवर लगतचा पूर्व नियोजीत रस्ता मुंबई महानगर पालिका डी वार्ड अंतर्गत तयार करण्याच्या कामात जाणून बुजून अडथळा आणला जात असल्यामुळे हे रस्ता रुंदीकरण व्हावे तसेच रहदारी वाहतुकीस नविन मार्ग लवकरात लवकर तयार करावा, अन्यथा उपोषणास बसु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल नागरे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिलेल्या तक्रार अर्जात दिला आहे.  

या संदर्भात अनिल नागरे यानी दिलेल्या माहिती नुसार, माहिती अधिकारात संबंधित विषया संदर्भात माहिती मागविल्या नंतर येथून रस्ता मंजूर करण्यात आलेला असल्याची जुजबी माहिती डी वार्ड अधिकाऱ्यांनी दिली आहे.परन्तु पुढे काहीच हालचाल होत नसल्याने शेवटी त्यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता यांना रस्ता होण्या संदर्भात तक्रार अर्ज दिलेला आहे.

या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल नागरे (मुंबई अध्यक्ष "एंटी करप्शन एंड क्राइम कंट्रोल कमिटी") यांनी पाठ पुरावा केला आहे.त्यांनी दिलेल्या माहिती नुसार येथील घाडीगावकर मार्ग मुंबई महानगर पालिकेच्याअंतर्गत येत असून नविन मंजूर रस्ता बांधण्याचे काम धनदांडग्यांच्या दबावामुळे सुरूच होत नाही. "नेमका असा कोणाचा दबाव आहे जेणे करुन हा रस्ता मंजूर होऊनही होत नाहि? यासंदर्भात गत 11 महिन्यां पासून मुंबई महानगर पालिका डी विभागात  ठक्कर टावर लगत जाणारा रस्ता सदय स्थितीतही तयार का होत नाही,' असा प्रश्न नागरे यांनी पालिका प्रशासनास केलेला आहे.

नागरिकांना आणि वाहतुकिस हा रस्ता निर्माण झाल्यास फारच सोईचे होईल परंतु हे काही होत नाही.सदर रस्ता बांधण्याकरिता महापालिका परिरक्षण विभागाने आराखडा नुसार नियोजित केलेली राखीव असलेली पालिकेची  जागा मोकळी करण्यात आलेली नसून त्या जागेवर ठक्कर टावर सोसायटीने  अनधिकृतरित्या ताबा घातला आहे.नेमका याच जागेवरुन महानगर पालिकेने नवीन मार्ग(रस्ता)   बांधण्यासाठी दोन जुनी झाडे तोडली होती.परंतु अजूनही तेथून रस्ता का बनविण्यात आलेला नाही.मग झाडे का तोडली, असा प्रश्न  अनिल नागरे पालिका अधिकाऱ्यांना विचारीत असून अधिकारी त्यांना दाद देत नाहीत.

मागील वर्ष भरात माहिती अधिकारात अनिल नागरे यांनी परिमंडळ एक   पालीका उपायुक्त, सहाय्यक आयुक्त डी विभाग,परिरक्षण अभियंता(डी विभाग) यांचे कडून मिळालेल्या माहिती नुसार नविन मार्ग (ठक्कर टावर्स)येथून जाणारा मार्ग अपुरा आहे तरीही तो होत नाहिये.ई वार्ड येथे असलेल्या पालिका उपायुक्त सुहास करंदीकर यांच्याशी या विषया संदर्भात(6 /11/2017) प्रत्यक्ष भेट घेतल्या नंतर त्यांनी पाहतो,अहवाल मागुन घेतो असे सांगितले.ही त्यांची  तिसरी वेळ आहे. माहिती घेतो कारवाई करतो. असे आश्वासन दिले आहे. या संदर्भात मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता यांना 10 नोव्हेंबर 17 रोजी भेटून त्यांच्या कड़े वरील मंजूर रस्ता करण्यात यावा असे  तक्रार आर्जाद्वारे सांगण्यात आले असून  रस्ता न झाल्यास उपोषण करण्यात येईल असा इशारा अनिल नागरे यांनी दिला आहे.

Web Title: mumbai news: road