पवईत आजपासून रोबोवॉर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मुंबई - पहिलवान किंवा कराटेपटूंच्या चुरशीच्या लढतींचा थरार तुम्ही नक्कीच अनुभवला असेल. पण, मुंबईत शुक्रवारपासून (ता. 29) पवईत होणाऱ्या टेकफेस्टच्या निमित्ताने चक्क रोबोंमधील युद्ध अनुभवण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी भारतातील रोबोंबरोबरच रशिया, चीन, बांगलादेश, ब्राझीलमधील रोबोही त्यांची ताकद आणि नैपुण्य दाखवणार आहेत.

अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांत रोबोटिक्‍सकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले जाते, तर भारतात तंत्रज्ञानाच्या स्पर्धेतला खेळ एवढीच संकल्पना मर्यादित आहे. त्यामुळे रोबोटिक्‍सच्या अधिकाधिक प्रचार, प्रसारासाठी टेकफेस्टच्या निमित्ताने हा पुढाकार घेतला असल्याची माहिती टेकफेस्ट आयोजक चमूचे सदस्य संचित मेहरोत्रा यांनी दिली.

रोबोवॉर दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने काही निकष पूर्ण करण्यात टेकफेस्टच्या चमूला काही वर्षांत यश आले नव्हते. यंदा या निकषांची पूर्तता केल्याने पाच आंतरराष्ट्रीय संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हा टेकफेस्ट रविवारपर्यंत (ता. 31) सुरू राहणार आहे.

रोबोटिक्‍ससाठी नवे उद्दिष्ट
विकसित देशांमध्ये रोबोटिक्‍सला मोठे स्थान मिळाले आहे. त्यांच्याप्रमाणेच भारतातही या क्षेत्राला स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. रोबो तयार करण्यासाठी अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांत मानधन देण्यात येते. त्याच धर्तीवर आयआयटी टेकफेस्टमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मानधन देण्याचा विचार आहे. पाच वर्षांत हे उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष्य आहे. रोबोवॉर स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या दोन विजेत्यांसाठी दोन लाखांचे पारितोषिक आहे. "फाइट माय बोट' या चिनी आयोजकांकडून दोन भारतीय चमूंचा खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार "आयआयटी' आणि "फाइट माय बोट'मध्ये झाला आहे.

Web Title: mumbai news robowar in pawai