कामगाराच्या पोटात सळई घुसली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई  - कफपरेडच्या रहेजा इमारतीच्या तळघरात स्लॅपचे काम सुरु असताना कामगाराचा तोल गेल्याने तो खाली पडला. खाली पडल्याने लोखंडी सळई त्याच्या पोटात घुसल्याची घटना शुक्रवारी(ता.12) रात्री घडली. राजेंद्र पाल असे जखमी कामगाराचे नाव असून त्याच्यावर धोबी तलाव येथील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

कफपरेडच्या रहेजा चेंबर येथील तळघरात स्लॅपचे काम सुरु आहे. स्लॅपच्या कामाकरता लोखंडी सळईचा ढाचा उभारण्यात आला होता. सायंकाळच्या सुमारास राजेंद्र हा प्लायवूड वरून जात असताना त्याचा तोल गेला. तोल गेल्याने राजेंद्र खाली कोसळला. खाली कोसळल्याने त्याच्या पोटात लोखंडी सळई घुसली. घडल्या प्रकराची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी सळई कापण्यात आली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे प्रमुख वैदयकीय अधिकारी डॉ. हेमंत कुमार यांनी राजेंद्रला तपासले. रात्री उशीरा त्याच्या पोटातील सळई काढण्याचे प्रयत्न सुरु होते. प्रयत्न सुरु असतानाच त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती. कामगार पडल्याची माहिती कळताच कफपरेड पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. 

Web Title: mumbai news rod entered worker stomach

टॅग्स