अभिनेता विवेक ओबेराय विरोधात दंडात्मक कारवाई, गुन्हा दाखल होण्याची शक्यता 

अनिश पाटील
Friday, 19 February 2021

गुरुवारचा व्हिडिओ आहे त्यामध्ये  विवेक ओबेराय चाकी वर डबलसीट फिरत होता.

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉय विना हेल्मेट दुचाकी चालवत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता,  त्यानंतर  वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  शुक्रवारी त्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : सावधान ! मुंबईत 17 टक्के रुग्ण वाढले, कोरोना व्हायरस झाला पुन्हा ऍक्टिव्ह
 

वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता विवेक ओबेराय याने मास्क घातलेला नाही, त्यामुळेही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

सांताक्रूझ वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याला वाहतूक पोलिसांनी पाचशे रुपये दंडाचे इ चलान आज पाठवले आहे. याबाबत सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यशस्वी यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

महत्त्वाची बातमी : थायमोसिन अल्फा 1, कोविड 19 रुग्णांसाठी फायदेशीर ठरणारी नवीन उपचार पद्धती

गुरुवारचा व्हिडिओ आहे त्यामध्ये  विवेक ओबेराय चाकी वर डबलसीट फिरत होता. यावेळी  पेट्रोल पंप वर थांबून त्याने चैतन सोबत छायाचित्रही काढलं. यावेळी त्याने मास्क काही परिधान केला नव्हता.

सेलिब्रेटींचे सामान्य नागरिक अनुकरण करतात. त्यामुळे त्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. व्हिडीओच्या आधारावर ही कारवाई करण्यात आले आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं. 

mumbai news RTO sent E challan to actor vivek oberoi for not wering helmet and mask


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news RTO sent E challan to actor vivek oberoi for not wearing helmet and mask