'रुईया'चा अमेरिकेतील दोन विद्यापीठांशी करार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - विद्यार्थ्यांना आधुनिक, व्यावसायिक शिक्षण मिळावे, या हेतूने माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाने अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया येथील इस्टर युनिव्हर्सिटी व हॅरिसबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजी ऑफ सायन्सशी सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे रुईया महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांना या विद्यापीठांतील अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. या करारांमुळे आमच्या महाविद्यालयातील कला व विज्ञान शाखेत आमूलाग्र बदल होतील, असा विश्‍वास रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांनी बुधवारी व्यक्त केला.
Web Title: mumbai news ruia college agreement with america university

टॅग्स