सचिन तेंडुलकरचा फ्लॅट आग लागून खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई - माजी कसोटीपटू सचिन तेंडुलकर याच्या वांद्रे येथील "ला मेरा' इमारतीतील जुन्या घराला मंगळवारी दुपारी आग लागली. या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीतील अग्निशमन यंत्रणा निकामी झाली असल्याने अग्निशमन दल नोटीस पाठवणार आहे.

वांद्रे पश्‍चिम येथील "ला मेरा' या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. हे घर सचिन तेंडुलकरचे असून, सध्या तिथे त्याचे सासू-सासरे राहतात. अग्निशमन दलाने वेळीच आग आटोक्‍यात आणल्याने अनर्थ टळला. याच इमारतीतील 12 आणि 13 वा मजला अभिनेत्री ऐश्‍वर्या रायच्या मालकीचा असून, तेथे तिची आई राहते. इतरही काही सेलिब्रेटी या इमारतीत राहतात.

आगीच्या वेळी इमारतीतील अग्निशमन यंत्रणा निकामी झाली होती. त्यामुळे इमारतीला अग्निसुरक्षा कायद्यानुसार नोटीस पाठवण्यात येणार आहे, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभाग रहांगळे यांनी सांगितले. अग्निशमन दलाने नोटीस पाठवल्यानंतर ठराविक मुदतीत ही यंत्रणा सुरू करावी लागेल. अन्यथा इमारतीचे वीज-पाणी तोडण्याचे अधिकार अग्निशमन दलाला आहेत.

Web Title: mumbai news sachin tendulkar flat fire