संभाजी भिडे यांचे व्याख्यान रद्द 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

मुंबई - पुण्यातील शनिवारवाड्याजवळ झालेल्या एल्गार परिषदेमुळे राज्यातील वातावरण बिघडले आहे. कोरेगाव- भीमामधील घटनेमागे या परिषदेत सहभागी झालेल्या संघटनांचा हात आहे, असा आरोप शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठानने शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या अनिता साळवे यांची जबानीही खोटी असल्याचा दावाही या वेळी करण्यात आला. भिडे यांचे रविवारी लालबागमध्ये होणारे व्याख्यान अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याची माहितीही याप्रसंगी देण्यात आली. 

संघटनेच्या मुंबई विभागाने या पत्रकार परिषदेत भिडे यांच्यावरील आरोप खोडून काढला. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर बेछूट आरोप करत आहेत. भिडे हे कोरेगाव भीमा येथे असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. प्रत्यक्षात भिडे साताऱ्याला होते, असा दावा या वेळी करण्यात आला. 

Web Title: mumbai news sambhaji bhide koregaon bhima