संमेलनानिमित्त पुस्तके अवघ्या 91 रुपयांत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई - बडोदे येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे यंदाचे 91 वे संमेलन आहे. त्यानिमित्ताने ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने अवघ्या 91 रुपयांत प्रसिद्ध पुस्तक विकत घेण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे. ही योजना 15 मार्चपर्यंत आहे.

योजनेनुसार 91 पुस्तकांचे 91 संच यानिमित्ताने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. पूर्ण 91 पुस्तकांच्या मूळ संचाची किंमत ही 21 हजार 775 रुपये असून, ती सवलतीच्या दरात 8 हजार 281 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बालसाहित्यावरही सूट जाहीर करण्यात आली आहे. गुलजार यांच्या नऊ पुस्तकांचा संच आणि नोबेलनगरीतील नवलपुस्तके हा सहा पुस्तकांचा संच दीड हजारांऐवजी 750 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Web Title: mumbai news sammelan book