‘चांगल्या वर्तणुकीमुळे संजयला सवलत’ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई - अभिनेता संजय दत्तला शिक्षेत कोणतीही खास सवलत दिलेली नाही. याबाबतीत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. तुरुंग प्रशासनाने दिलेली कामे त्याने योग्यरीत्या पूर्ण केली. त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केले.

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तने शिक्षा भोगली; परंतु शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यास आठ महिने असतानाच त्याची सुटका झाली होती. तुरुंग प्रशासनाने त्याला सतत पॅरोल मंजूर केल्यामुळे शिक्षेच्या कालावधीतही तो बराच काळ तुरुंगाबाहेरच होता. त्याच्यावर सरकार मेहेरबान असल्यामुळे शिक्षेत सवलत देण्यात आली, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी याचिकेत केला आहे. 

Web Title: mumbai news Sanjay Dutt