सायन-पनवेल टोलवेजच्या दोन अधिकाऱ्यांना जामीन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - सायन-पनवेल महामार्गावर जुलैमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी सायन-पनवेल टोलवेज कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.

मुंबई - सायन-पनवेल महामार्गावर जुलैमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी सायन-पनवेल टोलवेज कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.

सायन-पनवेल महामार्गावर जुलैमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार; तर तीन जण जखमी झाले होते. सायन-पनवेल टोलवेज कंपनीने महामार्गाच्या दुरुस्तीमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप आहे. सायन-पनवेल टोलवेजचे वरिष्ठ व्यवस्थापक रमजान अब्दुला पटेल व ऑपरेशन-देखभाल दुरुस्ती व्यवस्थापक संजीत श्रीवास्तव या दोघांना प्रत्येक एक लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला. उरण फाट्याजवळ 4 जुलैला झालेल्या या अपघातप्रकरणी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह एकूण पाच जणांवर सप्टेंबरमध्ये गुन्हा दाखल झाला होता.

Web Title: mumbai news sayan-panvel tollway officer bell