शाळा, महाविद्यालयांना घरगुती दराने वीज द्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई - शाळा व महाविद्यालयांकडून व्यावसायिक दराने वीजदर न आकारता घरगुती दर लावावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने सरकारकडे केली आहे. 

मुंबई - शाळा व महाविद्यालयांकडून व्यावसायिक दराने वीजदर न आकारता घरगुती दर लावावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने सरकारकडे केली आहे. 

शिक्षक परिषदेने नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. वीजआकारणी घरगुती दराने करावी, अशी मागणी या बैठकीत केल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने परिषदेचे उत्तर विभागाचे अनिल बोरनारे, बयाजी घेरडे व इतर प्रतिनिधींनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक संस्थांना खर्चासाठी वेतनेतर अनुदान दिले जाते. या तुटपुंज्या अनुदानातून शाळांचा खर्च भागवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. हा खर्च निघताना नाकीनऊ येते. त्यातच वीजबिल पाहून आणखी तारांबळ उडते, अशी तक्रार काही शाळांनी शिक्षक परिषदेकडे केली होती. 

शाळा व महाविद्यालयांत नियमानुसार शुल्क आकारले जाते. त्यामुळे विजेचा खर्च निघण्यासाठी शुल्कात वाढ करता येत नाही, हे लक्षात घेऊन घरगुती दराने वीजदर लावावेत, अशी शिक्षक परिषदेची मागणी आहे. 

Web Title: mumbai news school college electricity