मुंबई मेट्रोच्या सिक्युरिटी बोर्डचे कर्मचारी संपावर 

निलेश मोरे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

संपावर गेलेल्या कर्माचाऱ्यामुळे आज घाटकोपर मेट्रो स्थानकावर एकच धांदल उडाली त्याचा फटका यंत्रणांना बसला. असून मेट्रो मध्ये जाण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी सध्या स्थानकावर सुरक्षेचा पहारा ठेवला आहे.

मुंबई : मुंबई मेट्रो सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्डचे कर्मचारी आज (मंगळवार) सकाळपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत.

राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या करारावर घेतलेल्या या कामगाराना गृह खात्याच्या अंतर्गत घेऊन त्यांना पोलिसांसारखा दर्जा मिळावा. पगार योग्य पद्धतीने मिळावा, या मागणीसाठी कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. मुंबईत साधारणत 9 हजार कर्मचारी मेट्रो, मोनो, विमानतळ, रुग्णालये, शिर्डी संस्थान, गणेश संस्थान, तसेच देवस्थानाच्या सुरक्षेसाठी या बोर्डाच्या अंतर्गत तैनात आहेत.

संपावर गेलेल्या कर्माचाऱ्यामुळे आज घाटकोपर मेट्रो स्थानकावर एकच धांदल उडाली त्याचा फटका यंत्रणांना बसला. असून मेट्रो मध्ये जाण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी सध्या स्थानकावर सुरक्षेचा पहारा ठेवला आहे.

घाटकोपर पोलीस ठाणे हद्दीतील घाटकोपर मेट्रो स्टेशन येथे महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी संप पुकारला असून घटनास्थळी सहा. पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,  इतर अधिकारी व अंमलदार हजर आहेत. मेट्रो रेल्वे सुरळीतपणे चालू आहे.

Web Title: Mumbai news security guard agitation